मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी 'जहाज बांधणी'चे अर्थसाह्य
५ हजार कोटींचा प्रश्न सुटणार
धुळे : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला जहाज बांधणी मंत्रालयाच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांचा निधी रस्ते, जहाजबांधणी व दळणवळणमंत्री नितीन गडकरी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी शनिवारी येथे दिली. रेल्वे मंत्रालय व रस्ते, जहाज बांधणी, दळणवळण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे.
या रेल्वे...
more... मार्गासाठी एकूण १0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या एकूण निधीपैकी पाच हजार कोटींची तरतूद रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली असून उर्वरित निधी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारने द्यावयाचा होता. मात्र दोन्ही राज्य सरकारांसमोर आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे या मार्गाच्या निधीबाबत तोडगा काढण्यासाठी डॉ.भामरे यांनी प्रयत्न सुरू केले होते.
त्याचसाठी ५ ऑक्टोबरला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रस्ते, वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यासह दोन्ही विभागातील उच्च अधिकारी व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची बैठक झाली. त्यात ही मदत देण्याचे ठरले.
यासंदर्भात रेल्वे आणि जहाज बांधणी या दोन्ही मंत्रालयात लवकरच करार होणार आहे.