दक्षिण मध्य रेल्वे
जनसंपर्क विभाग, नांदेड
प्रेस नोट क्रं 283
दिनांक 22.05.2017
परभणी ते मिरखेल दरम्यान दुहेरी करणाच्या कामा करिता नोन इंटरलॉक वर्किंग मुळे काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द तर काही गाड्या उशिरा धावणार...
more...
परभणी ते मिरखेल दरम्यान दुहेरी करणाचे कार्य पूर्ण होत आलेय. या मध्ये सिग्नलिंग आणि इतर कामाकरिता दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 दरम्यान तेरा दिवस नोन इंटरलॉक वर्किंग चे काम सुरू राहणार आहे. या करिता काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत,काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या उशिरा धावतील. त्या पुढील प्रमाणे
ए) रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1) गाडी संख्या 57522 पूर्णा ते परळी सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 दरम्यान तेरा दिवस रद्द करण्यात आली आहे.या गाडीच्या प्रवाशांची गैरसोय दूर हयावी म्हणून गाडी संख्या 17614 नांदेड ते पनवेल या गाडीला या तेरा दिवसा दरम्यात गंगाखेड रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात येत आहे.
2) गाडी संख्या 57521 परळी ते पूर्णा सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 दरम्यान तेरा दिवस रद्द करण्यात आली आहे.
3) गाडी संख्या 17620 नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
ब) अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1) गाडी संख्या 57563 हैदराबाद ते परभणी सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 (तेरा दिवस ) पूर्णा ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी संख्या 57512 परभणी ते नांदेड ही सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 (तेरा दिवस ) परभणी ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
3) गाडी संख्या 57562 मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी दिनांक 24 मे 2017 ते 5 जून 2017 (तेरा दिवस ) मानवत रोड ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे म्हणून ह्याच गाडीचा रेक गाडी संख्या 57561 बनून मानवत रोड ते मनमाड असा धावेल.