ओशिवरा रेल्वेस्थानक नोव्हेंबरमध्ये होणार कार्यरत
अंधेरी ते बोरिवलीदरम्यान होत असलेले ओशिवरा रेल्वे स्थानक नोव्हेंबरमध्ये कार्यरत होणार असल्याची अशी ग्वाही मुंबई रेल विकास प्राधिकरणाचे प्रमुख आर. खुराना यांनी दिली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ओशिवरा रेल्वे स्थानक आणि परिसरात रेल्वे प्रवाशांकरिता आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुंबई रेल विकास प्राधिकरण, पोलीस सहआयुक्त, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, मुंबई महानगरपालिका, बेस्टचे महाव्यवस्थापक, उपजिल्हाधिकारी भूमी अभिलेख इत्यादी खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
ओशिवरा स्थानकाच्या पश्चिमेला उतरणाऱ्या प्रवाशांकरिता बेस्ट स्थानकाची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक असणारी जमीन बीईएसटीच्या ताब्यात असूनही तेथे...
more... स्टेशन उभारणीकरिता आवश्यक असणारा रस्ता उपलब्ध होत नव्हता. यासंदर्भात आवश्यक असणारी कार्यवाही आणि सहकार्य देण्याचे मुंबई पोलीस सहआयुक्त आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले. हार्बर मार्गावरील काही बांधकामांना पर्यायी जागा देण्यास एमएमआरडीए प्रशासनाने संमती दिली. त्यामुळे ओशिवरा स्थानक सुरू करण्यातील अडथळे दूर होऊन हार्बर मार्गावरूनही गोरेगाव स्थानकातून गाड्यांची वाहतूक सुरू होणार आहे