एका पोस्टने अधिकाऱ्याची बदली
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३१ : पुण्यासह देशातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रशासनाने सेल्फी पॉइंट तयार केले असून, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटोही लावला आहे. मात्र, एका सेल्फी पॉइंटसाठी आलेल्या खर्चाची माहिती देणे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले. रेल्वे बोडनि संबंधित पोस्टची दखल घेऊन त्यांची थेट मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी या पदावरून हकालपट्टी केली. मात्र...
more... ज्या अधिकाऱ्याच्या सहीने ही माहिती समोर आली, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
देशातील सर्वच प्रमुख रेल्वे स्थानकांवर 'डिजिटल इंडिया' संकल्पनेवर सेल्फी पॉइंट तयार केले आहेत. गेल्या आठवड्यात एका माहिती अधिकार कार्यकत्यनि मध्य रेल्वेसह देशातील १७ झोनच्या सेल्फी पॉइंटची माहिती मागितली. यात एका सेल्फी पॉइंटसाठी किती खर्च येतो, ही देखील माहिती विचारली होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी ती माहिती दिली. संबंधित कार्यकत्यनि त्या माहितीची कागदपत्रे समाजमाध्यमावर पोस्ट केली. त्यानंतर काँगेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी देखील तेच द्विट रीट्टिट केले.
रेल्वे बोडनि याची गंभीर दखल घेत, डॉ. मानसपुरे यांना पदावरून तत्काळ हटविले. मात्र ज्या अधिकाऱ्याने आपल्या सहीद्वारे ही माहिती उपलब्ध करून दिली, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. मानसपुरे यांची नियुक्ती मे २०२३ मध्ये झाली होती. अवघ्या सात महिन्यात त्यांना या पदावरून दूर करण्यात आले.
सेल्फी पॉइंटची किंमत सांगणे, त्यांना चांगलेच महागात पडले. डॉ. मानसपुरे यांच्या जागी पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आपला पदभारही स्वीकारला आहे. मानसपुरे हे अद्याप पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत.
3D
#SelfiePoint