रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरु करा
राष्ट्रवादी काँग्रेसने मोटारसायकल रॅली काढून वेधले लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन रॅलीत यांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरित पूर्ण...
more... करा, कुडवा लाईन परिसरातील पादचारी पूल सुरु करा, यासह शहरातील विविध समस्यांना घेऊन सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
गोंदिया - बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो पूल पाडण्यात आला. त्यामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले असून, रेलटोली परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, तर कुडवा लाईन परिसरातील रेल्वेचा पादचारी पूलसुध्दा रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेकदा पाठपुरावा व पत्र व्यवहार केला, पण, त्याचीसुध्दा दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्या मागणीसह सिंगलटोली रेल्वे चौकीजवळ अंडरग्राऊंड पूल तयार करावा. प्रधानमंत्री शहरी घरकुल योजनेचे थकीत हप्ते त्वरित द्यावेत, दिवाळीपूर्वी शहरातील केरकचरा साफ करावा आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक, रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना देण्यात आले. या समस्या त्वरित मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
रॅलीत यांचा सहभाग
माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्त्वात निघालेल्या या मोर्चात जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, विरेंद्र जैस्वाल, अशोक सहारे, चुन्नी बेंद्रे, आशाताई पाटील, प्रेम जैस्वाल, केतन तुरकर, रफिक खान, विशाल शेंडे, सतीश देशमुख, सुनील भालेराव, विनीत शहारे, हेमंत पंधरे, मनोहर वालदे, राजू एन. जैन, नानू मुदलियार, वेनेश्वर पंचबुद्धे, राजेश कापसे, खालिद पठाण, रवी मुडा, सैय्यद इकबाल, माधुरी नासरे, सुशीला भालेराव, पुष्पलता माने, सुदर्शना वर्मा, चंद्रकुमार चुटे, संजीव राय, सौरभ रोकडे, विनायक शर्मा, राजेश दवे, जुनेद शेख, कुंदा दोनोडे, विनायक खैरे, दीपक कनोजे, शंकर सहारे, एकनाथ वहिले आदी सहभागी झाले होते.